Breaking

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी दिलीप राव भोसले यांची निवड .......



सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी दिलीप राव भोसले यांची निवड ........


    ।।।।। बेंबळे परिसरात जल्लोष ।।।।

 
AJ 24 Taas News Maharashtra
  बेंबळे। प्रतिनिधी   
                     माढा तालुक्यातील बेंबळे- भोसलेवाडी येथील क्रियाशील कार्यकर्ते दिलीप आण्णासाहेब भोसले यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी दिलीप राव भोसले यांना प्रदान केले. याप्रसंगी माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश पाटील, यशवंतराव चव्हाण मंचचे प्रमुख रामभाऊ शिंदे सर्वश्री महाडिक, अविनाश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते 

   दिलीपराव भोसले हे आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, सभापती विक्रम शिंदे व जिल्हा परिषद सदस्य रणजीत भैय्या शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. दिलीपराव भोसले यांनी भोसलेवाडी येथील विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन, दूध संस्थेचे चेअरमन ,तसेच युवा मंच चे अध्यक्ष पद भूषवले आहे. बेंबळे च्या राजकारणामध्ये दिलीप राव भोसले हे नेहमी किंग मेकर ठरलेले आहेत. सध्या ते माढा तालुका  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत.
       सोलापूर जिल्ह्यात दिलीपराव भोसले यांचा मोठा मित्रपरिवार आहे. बेंबळे परिसरातील अनेक गावातील ग्रामपंचायत किंवा सहकारी सोसायटी किंवा दूध संस्था यांच्या निवडीमध्ये दिलीप राव भोसले हे नेहमी सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात.
       या निवडीबद्दल दिलीपराव भोसले म्हणाले की आदरणीय आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व  रंणजीतभैय्या शिंदे यांच्या सहकार्याने  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी यापुढे सोलापूर जिल्ह्यात निश्चितपणे हिमतीने प्रयत्न करण्यात येतील व संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याकडे आमचा कल राहील. या निवडीबद्दल दिलीप राव भोसले यांचे अनेक राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक ,व क्रीडा क्षेत्रातील  मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .लवकरच जिल्हा पातळीवरील रा.काँ.च्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिलीप राव भोसले यांचा भव्य सत्कार समारंभ, युवा मंचच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यांच्या निवडीनंतर बेंबळे -भोसलेवाडी परिसरात शेकडो कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा