*टेंभुर्णी परिसरात जोरदार पावसामुळे दोघांचे मृत्यू*
निमगाव-दहिवली रस्त्यावरून वाहून गेलेल्या स्विफ्ट कार मधील मृतदेह सापडला
*एस बी शिदे वार्ताहर निमगाव टे*
स्विफ्ट कार मधील मृतदेह निमगाव ग्रामस्थांनी बाहेर काढला.
निमगाव टे दि 15 . माढा तालुक्यातील निमगाव दहीवली रोडवरील निमगाव ओढ्यात वाहून गेलेल्या कारचा तपास लागला असून त्या कारमध्ये एकूण तीन प्रवासी होते त्यापैकी ड्रायव्हर असलेल्या एकाचा मृत्यू झाला असून इतर दोन प्रवासी उड्या मारून पुराच्या पाण्यातून सुदैवाने बचावले आहेत
एम एच 12 सि.पी4969 ही स्विफ्ट डिझायर गाडी ओढ्यातील पाण्यात वाहून गेली होती तिचा तपास गुरुवारी सकाळी नऊ वाजता लागला
या गाडीचा ड्रायव्हर शिवाजी बाजीराव यादव वय 36 राहणार मोरे वस्ती मांजरी पुणे या चा
गुदमरून मृत्यू झाला आहे
नितीन भागवत शेळके तानाजी दत्तात्रय शेळके राहणार उपळवाटे हे सुदैवाने बचावले आहेत ते दोघे रात्रभर गाडीतून उडया मारून पोहत झाडावर चढून बसले होते
घटनास्थळाला बुधवारी सायंकाळी आमदार संजय मामा शिंदे यांनी भेट देऊन वाहून गेलेल्या गाडीचा ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला तू मुसळधार पाऊस व मोठा पूर यामुळे शोध मोहीम अंधारामुळे थांबवावी लागली मात्र गुरुवारी सकाळी पासून निमगाव ग्रामस्थ टेंभुर्णी पोलीस स्टेशन तलाठी मोगल ग्रामसेवक मिटकल विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक लक्ष्मण आबा खूपसे यांनी गाडीचा तपास सुरू करून नऊ वाजता गाडीचा तपास लागला गाडी गाळात रुतल्या मुळे गाडी तेथेच ठेवून मृतदेह पोस्टमार्टम साठी टेंभुर्णी कडे रवाना करण्यात आला आहे घटनास्थळाला उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांनी भेट देऊन पाहणी केली.
*टेंभुर्णी शहरात ओढ्याच्या पाण्यात अडकून उद्धव खरात यांचा मृत्यू*
टेंभुर्णी शहरात ओढ्याला जास्त पाणी आल्याने सिद्धार्थ नगर मधील तिघेजण पाण्यात अडकले होते त्यापैकी टेंभुर्णी ग्रामस्थांना दोघांना वाचवण्यात यश आले मात्र सिद्धार्थ नगर मधील रहिवासी उद्धव खरात यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असे टेंभुर्णी परिसरात दोघांचे मृत्यू झाले आहेत.
दरम्यान कुर्डूवाडी टेंभूर्णी रोडवरील साखर कारखान्या जवळ ओढ्यात रात्रभर वाहतूक ठप्प झाली होती एक बस पाण्यात वाहून जाणारी पिंपळनेर येथील तरुणांच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरूप बचावले आहेत निमगाव पिंपळनेर रोड निमगाव उपळवटे रोड निमगाव दहीवली रोड हे रस्ते खचले असून वाड्या वस्त्यावर जाणारे ही या परिसरातील रस्त
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा