*निमगाव (टे) परिसरात बिबट्याने केला बोकडा हल्ला परीसरात खबराट*
*निमगाव प्रतिनिधी/ एस बी शिंदे*
निमगाव ( टे) दि. 17 .
माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथील अर्जुन गेना शिदे यांचे दोन वर्ष वयाचे बोकड बिबटयाने शुक्रवारी रात्री फाडून खालले असुन राहिलेला भाग वस्ती पासून थोडया अंतरावर पडला आहे
याबाबत अधिक माहिती अशी कि अर्जुन शिदे हे शेतात वस्ती वर राहायला आहेत शनिवारी सकाळी उठल्यावर हाप्रकार त्याचे लक्षात आला वस्तीजवळ बिबट्या सारखे ठसे दिसले असून वस्ती पासून सुमारे दोनशे फुट अंतरावर बोकडाचा उर्वरित भाग आढळून आला आहे
दहिवली कंदर या गावात सलग दोन दिवस बिबट्या शेतकऱ्यांना दिसत असल्याने शेतकऱ्यांत चर्चा आहे
या मूळे यापरीसरात शेतकरी रानात जाण्यासाठी घाबरत आहेत
..
शुक्रवारी दहिवली येथील भीमा सिना बोगदा परीसरात शेतकऱ्यांना बिबट्या दिसला होता तर गुरुवारी कंदर येथे दिसल्याची चर्चा आहे
या बाबतीत वन खात्याने योग्य खबरदारी घेऊन बिबट्याचा बदोबस्त करण्याची मागणी शेतकरयातुन
सध्या वस्तिवर रहाणारे शेतकरी बिबट्या च्या भितीने रात्रभर जागुन पहारा देत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा