राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष पदाची माळ गौरव झांझूर्णेच्या गळ्यात पाडण्यासाठी राष्ट्रवादीत खलबते
करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील
राष्ट्रवादी युवक काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी करमाळा तालुक्यामध्ये प्रचंड रस्सीखेच असून मकाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आप्पासाहेब झांझूर्णे यांचे पुतणे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पश्चिम भागातील कार्यकर्ते आहेत.गौरव झांझूर्णे यांच्या गळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाची माळ पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खलबते सुरू आहेत. गौरव झांझूर्णे यांच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी कंबर कसली असून त्यांनी या निवडीसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. याबाबत बोलताना हनुमंत मांढरे पाटील म्हणाले की गौरव झांझूर्णे हा मकाईचे संस्थापक चेअरमन आप्पासाहेब झांझूर्णे यांचा पुतण्या आहे. आप्पासाहेब हे राष्ट्रवाडीचे संस्थापक शरदराव पवार यांच्या अतिशय विश्वासातले म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या स्थापनेपासून ,सत्ता असो अथवा नसो झांझूर्णे कुटुंब नेहमीच राष्ट्रवादीच्या सोबत राहिले आहे. आज राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे अनेकांना पॅड असावे वाटते मात्र पक्षाच्या वाईट काळात सोडचिठ्ठी देऊन शिवबंधन बांधणारे संधिसाधू पण राष्ट्रवादीचे पद मागत आहेत. परंतु माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश पदाधिकारी गौरव झांझूर्णे यांच्या नावाला अनुकूल असल्यामुळे गौरव झांझूर्णे यांची निवड निश्चित आहे .आणि गौरव झांझूर्णे यांच्या निवडीसाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा