*अरुण लाड यांना करमाळा तालुक्यातून मताधिक्य मिळवून देणार-शिवराज जगताप*
*करमाळा तालुका प्रतिनिधी-अतुल वारे पाटील*
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पदविधरांच्या हितासाठी तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आघाडीचाच उमेदवार निवडून येणे गरजेचे असल्याने अरुण लाड यांना करमाळा तालुक्यातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपण तालुक्यात सर्वत्र मतदारांच्या संपर्कात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा शहर प्रमुख शिवराज जगताप यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की पुणे पदवीधर मतदार संघ नेहमीच जातीयवाद्यांकडे राहिला आहे. पदविधरांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अरुण लाड हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील असीम योगदान दिलेल्या क्रांतिकारकांचे रक्ताचे आणि विचारांचे वारसदार असून त्यांनी आपली हयात शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी खर्ची घातलेली आहे.त्यामुळे अरुण गणपती लाड यांना प्रथम पसंतीचे मत देऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा