Breaking

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

सोलापुरात क्रांतिची परंपरा कायम राहिल. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे





*सोलापुरात क्रांतिची परंपरा कायम राहिल. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे 

सोलापूर प्रतिनिधी
 AJ 24 Taas News Maharashtra

                    पुणे पदविधर मतदारसंघातील श्री अरूण आण्णा लाड व पुणे शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री माननीय श्री जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा)भरणे यांनी पदविधर मतदारसंघातून उभे असलेले उमेदवार श्री अरुण आण्णा लाड यांच्या घराला क्रांतिच्या विचारांचा वारसा असून सोलापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना सोलापूरकर विक्रमी मतदान देऊन क्रांतिची परंपरा कायम ठेवतील असा विश्वास नामदार श्री भरणे मामा यांनी व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार श्री उदय सामंत, राज्यमंत्री नामदार श्री सतेज पाटील,काॅंग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री श्री सिध्दाराम म्हेत्रे,माढाचे आमदार श्री बबनदादा शिंदे, शिवसेनेचे आमदार श्री शहाजी बापु पाटील,करमाळाचे आमदार श्री संजयमामा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार श्री दिपक आबा साळुंके पाटील, मोहोळचे आमदार श्री यशवंत तात्या माने,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री उत्तमराव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री बळीराम काका साठे, कार्यकारी जिल्हाध्यक्ष श्री उमेश पाटील, महाराष्ट्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री अजिंक्यराणा पाटील,माजी महापौर व जेष्ठ नेते श्री मनोहर सपाटे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष श्री गणेश पाटील,शहर युवक अध्यक्ष श्री जुबेर बागवान, सोलापूर जिल्हा सोशियल मिडीयाचे अध्यक्ष श्री मिलिंद गोरे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

....
*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा