Breaking

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान........ माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या साठी 27 कोटी 48 लाख रुपये शासकीय अनुदान उपलब्ध.... आ.बबनदादा शिंदे




अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान........
 माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या साठी 27 कोटी 48 लाख रुपये शासकीय अनुदान उपलब्ध....     आ.बबनदादा शिंदे
            

*AJ 24 Taas News Maharashtra 

                              
   बेंबळे । प्रतिनिधी         

         13 ऑगस्ट ते  20 ऑगस्ट 20 दरम्यान सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व त्याच दरम्यान भीमा व सीना नदीला आलेल्या मोठ्या महापुरामुळे झालेल्या शेतीच्या बागायती व जिरायती पिकांचे नुकसान भरपाईपोटी माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या साठी 27 कोटी 48 लाख रुपये अनुदानाचा निधी  शासनाकडून उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलेली आहे ., व हा निधी तातडीने संमंधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे
      वृत्तांत असा की सोलापूर जिल्ह्यात बारा-तेरा ते 20 ऑगस्ट दरम्यान सर्वत्र तुफान पर्जन्यवृष्टी झाली व त्यामुळे नद्या ,नाले, ओढे यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले,. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या. ग्रामीण भागात अनेकांची घरे उध्वस्त झाली. उजनी धरणातील पाण्याची पातळी वाढू लागली व त्यातून टप्प्याटप्प्याने तीन लाख क्यूसेक्स पाणी भीमा नदीत सोडण्यात आले  व याच दरम्यान सीना नदीलाही मोठा महापूर आला. या अतिवृष्टी आणि भीमा व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे झालेल्या  नुकसानीचे पंचनामे माढा तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी अतिशय तत्परतेने करून संपूर्ण अहवाल शासनाकडे सादर केला. यानुसार सध्या तुर्तास माढा तालुक्या साठी 27 कोटी 48 लाख रुपये नुकसान भरपाई अनुदान शासनाकडून प्राप्त झाले आहे. जिरायत नुकसानीसाठी हेक्टरी10 हजार हजार रुपये तर बागायतीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तातडीने जमा होणार असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
 चौकट......
       फक्त 50 ते 55 टक्के अनुदान रक्कम उपलब्ध....                         
                                       माढा तालुक्यातील
 अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसान ग्रस्तां साठी,  27 कोटी 48 लाख रुपये शासकीय अनुदान  प्राप्त झाले आहे. ही अनुदानाची आलेली रक्कम, एकूण मागणीच्या 50 ते 55 टक्के मिळालेली आहे. उरलेली रक्कम शासनाकडून आगामी काही दिवसानंतर निश्चित उपलब्ध होईल.  जीराईता  साठी हेक्टरी 10 हजारहजार रुपये तर बागायतीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये प्रमाणे अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झालेली आहे.
 राजेश चव्हाण, तहसीलदार ,माढा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा