*निमगाव (ह) येथील अतिक्रमण केलेला सरकारी रस्ता तात्काळ खुला न केल्यास बेमुदत उपोषण करणार- गणेश नीळ*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
करमाळा तालुक्यातील
निमगाव (ह)येथील अतिक्रमण केलेला रस्ता तात्काळ खुला करावा अन्यथा बेमुदत उपोषणा चा ईशारा गणेश नीळ यांनी दिला आहे.पोलीस निरीक्षक करमाळा यांना लेखी तक्रार करून निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले की, करमाळा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेले निमगाव ह येथील शेतकर्यानी गाव नकाशात असलेल्या सरकारी रस्त्यावर अतिक्रमण करून गावातील शेतकऱ्यांना सोयीचा असणारा रस्ता बंद केला आहे. याशिवाय त्यांची शेतजमीन मुख्य रस्त्याच्या लगतच असतांनाही मुद्दामहून आम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने आमच्या मालकीच्या गट नं७० या जमिनीतून रस्ता मागणी केली होती. त्यावर मा तहसीलदार यांनी सर्व प्रकारच्या बाबींची चौकशी करून रस्ता केस बद्दल न्याय निवाडा देऊन संबंधित लोकांची मागणी फेटाळून लावली आहे. असे असतानाही त्यांनी आमच्या शेतांत जबरदस्तीने, अनधिकृत पणे रस्ता तयार करून घेतला आहे. व विनाकारण आमच्या बरोबर भांडण करून पोलिसांत तक्रार दिली होती. त्यामुळे आमच्या लोकांवर गुन्हा दाखल झाले आहेत, तसेच ज्यांनी सरकारी रस्ता बंद केला आहे तेच रस्ता चोर उलट्या बोंबा मारून प्रशासनास वेठीस धरून उपोषणास बसलेले आहेत.त्यांनीच आमच्या शेतीचे, मोठया प्रमाणात नुकसान करून फरार झाले आहेत.उपोषणास बसलेले व त्यांचे घरातील लोकांच्या विरोधात करमाळा पोलिसांत गु, र,नं ११९७ ,अन्वये गुन्हा दाखल झाला आहे त्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी
अन्यथा आम्ही उपोषणास बसणार आहोत असे लेखी निवेदन सादर केले आहे.
या निवेदनावर गणेश नीळ, कालिदास नीळ, गुरुदास नीळ, अंकुश नीळ यांच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा