टेंभुर्णी [प्रतिनिधी]
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे तालुका माढा येथील टोल नाक्या नजीक ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास भरधाव टेम्पोने धडक दिल्याने पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची खबर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात महामार्ग वाहतूक पोलीस नाईक हरिदास विष्णू माळी यांनी दिली आहे.
मयत पोलीस कर्मचारी,
अपघातातील टेम्पो.
अपघातातील वाहन चालक
टेंभुर्णी/प्रतिनिधी- AJ 24 Taas News Maharashtra
टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पोलीस नाईक सागर औदुंबर चोबे वय 34 रा.बार्शी हे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे टोल नाक्याजवळ वाहतूक केसेस चालू असताना. टेम्पो क्रमांक MH.04HD.0170 हा सोलापूर कडून पुण्याकडे निघाला असता तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक चोबे यांनी त्या टेम्पोस थांबण्यासाठी हात केला असता,यावेळी मद्यधुंद असलेल्या टेम्पो चालकाने भरधाव वेगाने पोलीस कर्मचारी चोबे यांना जोरदार धडक दिली त्यामध्ये पोलीस कर्मचारी चोबे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात रविवार (दि06) रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला
सदर टेम्पो हा हैदराबादहून मुंबईला मेडिसिन घेऊन निघाला होता. टेम्पो चालक आरोपी नवनाथ शिवाजी गुट्टे (रा.परळी वैजनाथ जि बीड)यास अटक करण्यात आली असून,त्याच्यावरती भादवि कलम 304(2) अनुसार टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
या अपघाताची खबर कळताच महामार्ग पोलीस पुणे विभागीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर,करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल हिरे,महामार्ग पोलीस निरीक्षक रामेश्वर पडवळकर टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा