Breaking

रविवार, १७ जानेवारी, २०२१

इंदापूरातील तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींसाठी ८१.७६ टक्के मतदान झाले ! हर्षवर्धन पाटील व दत्ताञय भरणे यांची प्रतिष्ठा लागली पणाला!



*इंदापूरातील तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींसाठी ८१.७६ टक्के मतदान झाले ! हर्षवर्धन पाटील व दत्ताञय भरणे  यांची प्रतिष्ठा लागली पणाला!*

इंदापूर प्रतिनिधी :-शिवाजी पवार

इंदापूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८१.७६ टक्के मतदान झाले.यंदा कोरोना परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा उत्साह चांगलाच पाहिला मिळाला असून ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीवादी भाजप पक्ष्याकडे किती ग्रामपंचायत जाणार याकडे इंदापुर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.तालुक्यातील ग्रामपंचायती ठिकाणी ते ९० टक्के सरासरी म्हणजेच मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने बऱ्याच ठिकाणी सत्ताबदल होऊन अत्यंत कमी अशा फरकाने अनेक उमेदवार विजयी होतील असे तालुक्यातील राजकिय विश्लेषकांनी अंदाज व्यक्त केला आहे .इंदापूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायती साठी १ लाख ५८ हजार ५९९ एकूण मतदारांपैकी १ लाख २९ हजार ६६६ मतदारांनी आपला मताचा अधिकार बजावला 

ग्रामपंचायत निवडणूक मतदान २०२१ सरासरी टक्केवारी पुढीलप्रमाणे:-भिगवण ७९.८९ टक्के, तक्रारवाडी ८२.३४, पोंधवडी ९०.२१टक्के, कुंभारगाव ८९.३४ टक्के, अकोले ८६.०७ टक्के, शेटफळ गढे ८४.८३ टक्के, निंबोडी ८८.९९ टक्के, निरगुडे ८९.६३ टक्के, पिंपळे ८६.४७ टक्के, भांडगाव ८५.२७ टक्के, भोडणी७८.३८ टक्के, पिंपरी बुद्रुक ८९.५४ टक्के, नरसिंहपूर ८३.०७ टक्के, टण्णू ९८.८३ टक्के, गिरवी ९१.८९ टक्के, गोंदी ओझरे ९०.६५ टक्के, चाकाटी ९०.१४ टक्के, पिठेवाडी ८९.९० टक्के, भादलवाडी ६९.५२, कळस ८३.८९ टक्के, भरणेवाडी ८०.७२ टक्के, वालचंदनगर ५८.९२ टक्के, कळंब ७७.२७  टक्के, अंथुर्णे ८१.५० टक्के, पळसदेव ८५.९५  टक्के, रुई ८३.८५ टक्के, गलांडवाडी नंबर १ /नरुटवाडी ८७.३६ टक्के, लोणी देवकर ८८.४२ टक्के, भावडी ९०.११ टक्के, चांडगाव ९०.२३ टक्के, बळपुडी ९६.८८ टक्के, सरडेवाडी ८६.९७ टक्के, शहा ९०.९१  टक्के, बाभूळगाव ८७.३४  टक्के, गलांडवाडी नंबर २- ९२.१० टक्के, तरंगवाडी ८९.०२  टक्के, वरकुटे खुर्द ८४.४६  टक्के, काटी ८३.५४ टक्के, रेडा ८७.८९ सराफवाडी ९०.१९  टक्के, पिटकेश्वर ८९.३५  टक्के, सणसर ७५.११ टक्के, तावशी ७८.९२  टक्के, सपकळवाडी ८६.०७ टक्के, लासुर्णे ७४.६१ टक्के, चिखली  ९३.१४  टक्के, निमगाव केतकी ८०.९८ टक्के, कौठळी ७४.३८ टक्के, व्याहाळी ८५.५६  टक्के, कडबनवाडी ८८.७६ टक्के, कचरवाडी (निमगाव केतकी) ९१.२२ टक्के, निमसाखर ७८.७९ टक्के, गोतंडी ८५.०९  टक्के, निरवांगी ८२.७३ टक्के, हगारवाडी ८७.४५ टक्के, दगडवाडी ८५ .३९ टक्के, घोरपडवाडी ८२.०४ टक्के, अशी आहे.इंदापूर तालुक्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून सोमवारी (ता.१८ ) जानेवारी रोजी इंदापूर येथील शासकीय गोडाऊन ग्रामपंचायत निवडणूक  मतमोजणी येथे होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा