Breaking

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती जिजाऊ ब्रिगेडने उत्साहात साजरी केली.



राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती जिजाऊ ब्रिगेडने उत्साहात साजरी केली.
प्रतिनिधी प्रतिनिधी/AJ 24 Taas News

जिजाऊ ब्रिगेड,राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त तन, मनाने काम करणाऱ्या सफाई कामगार भगिनींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ सफाई कामगार यांच्या हस्ते गाडगेबाबा, आणि जिजाऊ प्रतिमा पूजन,व जिजाऊ वंदनेने करण्यात आली
पुढे जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष, शिवमती सुरजा ताई बोबडे आपले विचार मांडताना म्हणाल्या,अज्ञान,अंधश्रद्धा, अस्वच्छता यामध्ये गुरफटलेल्या समाजाला आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ,वैचारीक प्रबोधन करून समाजाला खडबडून जागे करणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा.
या महापुरुषांच्या, थोर संतांच्या जयंती साजरी करण्यामागचा उद्देश,त्यांचा खरा इतिहास, त्यांचे परिवर्तन वादी विचार समाजापर्यंत पोहचवून,त्यांचे,नुसते डोक्यात न ठेवता,त्याप्रमाणे आचरण,बदल,करणं आणि जाचक रूढी,परंपरा यातून बाहेर पडून,सत्यशोधक समाज बनण्याची गरज आहे, आणि त्यांच्या विचारांचा प्रसार, आणि प्रचार करून दैववादी न राहता विज्ञानवादी होणं गरजेचं आहे,आणि आपली प्रत्येक मैत्रीण मनाने,विचाराने,सक्षम व्हावी यासाठी जिजाऊ ब्रिगेड नेहमीच प्रयत्नशील राही ल.
पुढे,गाडगेबाबा यांचे विचार,शिवमती संजीवनी आरबोळे यांनी थोडक्यात मांडले,देव माणसात आहे,दगडात नाही,शिका,अडाणी राहू नका,दिन-दुबळ्याची सेवा करा,चमत्कारावर विश्वास न ठेवता,विचारांवर विश्वास ठेवा,व्यसन करू नका,असे अनेक मोलाचे प्रबोधन आपल्या कीर्तनातून,करणारे संत गाडगे बाबा, स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण, सार्वजनिक हिताची कामे,सर्व जनांनी एकवटून केली पाहिजेत, हा धडा शिकवणाऱ्या गाडगेबाबा यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली
तन, मनाने स्वछता ,करून आपलं आरोग्य सुरक्षित ठेवणाऱ्या अश्या सफाई कामगार भगिनींचा, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे,व त्यांच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करावी,म्हणून साडी,चोळी,सॅनिटायझर, मास्क,फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपात उपस्थित सर्व सफाई  कामगार भगिनींचा सन्मान करण्यात आला
यावेळी उपस्थित, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष,शिवमती सुरजाताई बोबडे,कार्याध्यक्ष शिवमती रत्नमाला शिंदे,वैचारीक प्रबोधन उपाध्यक्ष, शिवमती रोहिणी कोठावळे, सचिव,शिवमती संजीवनी आरबोळे,सहसचिव, शिवमती आशा निमसे,उपाध्यक्ष उपक्रम, शिवमती सोनाली हुंबे,उपाध्यक्ष प्रशिक्षण, शिवमती वंदना चौधरी, प्रवक्ता वैद्यकिय ,शिवमती अश्विनी ढवळे, संघटक,शिवमती शोभा कदम, शिवमती स्वाती साखरे,शिवमती सारिका शिखरे,शिवमती,वैशाली गायकवाड, शहर प्रसिद्धी प्रमुख शिवमती जयश्री तांबे,शिवमती मिताली शहा,सदस्या मेघा जाधव, शिवमती सुषमा लोंढे या सर्वांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा