*कुर्डुवाडीचा पहिला सुपुत्र दिग्विजय संभाजी गोरे यांची युपीएससी परीक्षेत विजयी पताका...*
*"अॅसिस्टंट कमांडट"पदी निवड...*
कुर्डूवाडी प्रतिनिधी /अरुण कोरे
*कुर्डुवाडी येथील सुपुत्र दिग्विजय संभाजी गोरे यांने युपीएससी परीक्षेत देशात १८६ वा क्रमांक पटकावून घवघवीत यश प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.*
*दिग्विजय गोरे हा प्राध्यापक संभाजी गोरे यांचा सुपुत्र असून त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आर.एन.सामाणी, व के.आय.टी.महाविद्यालय, कोल्हापूर येथे झाले आहे.*
*बी.ई.मॅकेनिकलची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांने ज्ञान प्रबोधिनी पुणे येथून स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेश घेतला होता.सतत अध्ययन, प्रयत्न, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर दुसऱ्याच प्रयत्नांत त्याची भारतीय सेवेत "अॅसिस्टंट कमांडट" पदी निवड झाल्यानें त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.*
*आई-वडील,भाऊ,शिक्षकगण व मित्रपरिवाराच्या योग्य मार्गदर्शनामुळे यश प्राप्त केल्याचे त्यांने विनम्रपणे नमूद केले.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा