*करमाळा तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा करमाळा दौरा संपन्न*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
तालुक्यातील नागरिकांच्या अडचणीचे निवारण व नवनिर्वाचित सरपंचांशी संवाद साधण्यासाठी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर होते.
या दौऱ्या दरम्यान सर्व शेतकरी बांधव व नूतन सरपंच यांचे प्रश्न,अडचणी निवारण साठी खासदार निंबाळकर करमाळा भाजपा संपर्क कार्यालयात उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न म्हणजे तोडलेल्या वीज कनेक्शन लवकरात लवकर जोडावे या दरम्यान विद्युत वितरण महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते. खासदार निंबाळकर यानी शेतकरी बांधवासमोर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की तोडलेल्या वीज कनेक्शन तात्काळ जोडून घ्या तसेच फक्त चालू एक बिलच शेतकरी भरतील आणि मागील थकबाकीची रक्कम माफ व्हावी यासाठी मी पूर्ण पणे प्रयत्न करेल.
यांनतर नवनिर्वाचित 36 ग्रामपंचायत सरपंचांचे सत्कार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख , तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंचांनी खासदार निधीतून आपल्या आपल्या गावात वेगवेगळ्या प्रकारच्या कामाचे निवेदन खासदार निंबाळकर यांना दीले खासदार साहेबांनी ही आश्वासन दीले की प्रत्येक गावात भरपूर असा निधी देण्याचा प्रयत्न करू.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ, सवितादेवी राजे भोसले, भाजपा जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, विस्तारक भगवान गिरी गोसावी, महाराष्ट्र चॅम्पियन अपसर जाधव, मोहन शिंदे,भाजपचे सरचिटणीस काकासाहेब सरडे,अमरजीत साळुंखे,तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे,सचिन राऊत, दादासाहेब देवकर, अभिजित मुरूमकर, मच्छिंद्र हाके, संभाजी शिंदे, दत्तात्रय पोटे, तालुका चिटणीस अजिनाथ सुरवसे, अशोक ढेरे, किरण वाळुंजकर ,तालुका प्रसिध्दी प्रमुख जयंत काळे पाटील ,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष धर्मराज नाळे,महिला आघाडी तालुका अध्यक्ष भाग्यश्री कुलकर्णी ,जिल्हा कार्यकारणी सदस्य राजश्री खाडे,उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब होसिंग, व्यापार आघाडी तालुकाध्यक्ष लखन ठोंबरे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष अशोक मोरे, भटके विमुक्त आघाडी चे तालुकाध्यक्ष लखन चिरके, आदि उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा