कोल्हापूर च्या चंद्रकांत पटला सह मोडनिंब येथे दहा जण वरती गुन्हा दाखल
मोडनिंब प्रतिनिधी
मोडनिंब येथे जुगार खेळणाऱ्या १० जणांकडून ८ हजार ५४० रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शंभूराजे मोरे यांचे गोडाऊन पाठीमागील इरिगेशनच्या मोकळ्या जागेत झाडाखाली १)समाधान उत्तम भोसले (रा रोपळे),२)सचिन नर्हरी मोरे,३)अजिंक्य मोहन मोरे,४)नितीन शिवाजी मोरे,५)निखिल दिगंबर मोरे,६)सुजित सुनिल गाडे ,७)समाधान दिनकर मोहिते (रा बावी) ८)दिग्विजय अशोक पवार (रा.माढा) ९)धनाजी हरी ताटे (रा.जाधव वाडी) १०)चंद्रकांत पाटील (रा.उद्यम नगर कोल्हापूर) हे सर्वजण गोलाकार बसून पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळत असताना पकडण्यात आले. वरील सर्वांकडून ७ हजार ५४० रुपये रोख रक्कम व ५०० रुपये किमतीचे २ मोबाईल असा एकूण ८ हजार ५४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार भोसले हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा