Breaking

सोमवार, १५ मार्च, २०२१

सातारा जिल्हा शिक्षक शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाईन पध्दतीने होणार*





*सातारा जिल्हा शिक्षक शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाईन पध्दतीने होणार*


         वडूज : प्रतिनिधी /शरद कदम

सातारा जिल्हयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची अर्थवाहिनी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या वडूज येथील सातारा जिल्हा शिक्षक शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा  पतसंस्थेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थचे अध्यक्ष श्री राजेंद्र पवार यांचे अध्यक्षते खाली रविवार दिनांक २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ऑन लाईन पद्धतीने संपन्न होणार आहे. करोना रुग्णात होणारी वाढ पाहता राज्य शासनाच्या २५ फेब्रुवारी च्या निर्णयानुसार पतसंस्थेची वार्षिक सभा झूम अॅप द्वारे ऑन लाईन घेणेत येणार आहे. या बाबत सर्व सभासदांना सभेचे नोटीस व सभेपुढील विषय या बाबत लेखी स्वरूपात कळवले आहे. वार्षिक सभा  मेसेज पाठवले आहेत सदर सभेची लींक आपल्या कार्यक्षेत्रातील संचालकामार्फत सर्व सभासदांना पाठवली जात आहे. तरी सर्व सभासदांनी सातारा जिल्हा शिक्षक शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा या पतसंस्थेच्या ऑन लाईन वार्षिक सभेत सहभागी होणेचे आवाहन पतसंस्थेचे उपाध्यक्ष मिलींदकुमार घार्गे, सचिव संजयकुंभार व सर्व संचालक मंडळाने केले आहे.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा