जिजाऊ ब्रिगेड माळशिरस तालुक्यात मळोली येथे ग्रामशाखेची स्थापना
माळशिरस तालुका प्रतिनिधी भाग्यवंत नायकुडे
AJ 24 Taas News Maharashtra channel
मराठा सेवा संघ प्रणित , जिजाऊ ब्रिगेड सोलापूर (पंढरपूर विभाग) यांच्या वतीने मळोली येथे ग्रामशाखेची स्थापना करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेड सोलापूर पंढरपूर विभागाच्या जिल्हाध्यक्षा शिवमती सुरजा योगेश बोबडे व जिल्हा कार्याध्यक्षा शिवमती मिनाक्षी अमोल जगदाळे जिल्हा उपाध्यक्ष शिवमती मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका अध्यक्ष शिवमती मनोरमा लावंड यांच्या प्रयत्नातून ग्रामशाखेची ची स्थापना करण्यात आली . जिजाऊंच्या व सावित्री च्या प्रतिमापूजन व जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . यावेळी शिवमती योगिता जाधव मळोली ग्राम शाखाध्यक्ष, शिवमती सुवर्णा शिंदे कार्याध्यक्ष ,शिवमती उषा रणवरे उपाध्यक्ष, शिवमती वर्षाराणी जाधव सचिव, शिवमती सुरेखा जाधव संघटक यांची निवड करण्यात आली .यावेळी प्रास्ताविकामध्ये जिल्हाध्यक्ष शिवमती सुरजाताई बोबडे यांनी मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड च्या विचार धारेबद्दल माहिती दिली. जिजाऊ ब्रिगेड ही महिलांची सामाजिक , आर्थिक वैचारिक सक्षमीकरण करणारी संघटना आहे असे त्या म्हणाल्या.तसेच सौ शिवमती मीनाक्षीताई जगदाळे यांनी महिलांचे संघटन कसे असावे व जिजाऊ ब्रिगेडचा विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन याबद्दल महिलांना मार्गदर्शन केले.मनिषा जाधव यांनी माहिलांचे मजबूत संघटन असावे असे मार्गदर्शन केले. सर्वांच्या सहकार्यातून जिजाऊ ब्रिगेड वाढवू असे मनोरमा लावंड म्हणाल्या.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवमती मनीषा जाधव ,तालुकाध्यक्ष शिवमती मनोरमा लावंड, सहसचिव आशा निमसे, अकलूज कार्याध्यक्ष शिवमती शारदा चव्हाण ,यावेळी उपस्थित होत्या .यावेळी मळोली ली तील असंख्य महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा