प्राथमिक उपकेंद्र उमरा येथे कोविड लसीकरणाचे उद्घाटन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र उमरा येथे कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ सरपंच शेषीकला वाघमारे,जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी सुभाषराव गायकवाड तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक गणेशराव सिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
डॉ.आर.के.मुनेश्वर यांनी उपस्थित नागरिकांना कोविड १९ बद्दल व कोविडच्या लसीबद्दल मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावे असे आव्हान त्यांनी केले.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उमरा येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.श्वेता खाडे यांनी येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून लसीकरण घेण्याचे आवाहन करत सर्व रुग्णांची काळजी घेतली.या लसीकरणामध्ये ५० रुग्णांनी लस घेतल्याचे डॉ.श्वेता खाडे यांनी सांगितले.
त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.के मुनेश्वर समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.श्वेता खाडे ए.एन.एम.खादीवाले,झंपलवाड एम पी डब्ल्यू सावळे सुपरवायझर इंदूरकर,श्रीमंगले,आशा वर्कर किशनबाई पवार,तलाठी पुजारानी कुंटूरकर ग्रामसेवक मंगणाळीकर एम डी.सिरसाट,नारायण पुयड,गोविंदराव शिंदे जोमेगावकर,सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन जीवन पवार,आनंदा वाघमारे बालाजी पवळे ग्रामपंचायत क्लार्क मुबिन शेख तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.
उमरा येथील गावकऱ्यांनी कोरोना सारख्या अतिभयंकर काळात आपण आमच्या आरोग्याची काळजी घेतल्यास बद्दल व कोविड लस गावातच उपलब्ध करून दिल्या बद्दल आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर,कर्मचारी तसेच शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा