देवणी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करा ,अन्यथा टाळे ठोकण्यात येईल - श्री . पृथ्वीराज जीवणे पाटिल*
*जिल्हा प्रतिनिधि :जीवन भोसले* (उदगीर)
*देवणी*( लातूर) (दि. 28 )देवणी शहर व तालुक्यातील वाढत्या कोरोना आजरावर ब्रेक करण्याची अत्यंत गरजेचे असल्याचे बोलले जात असुन, कोरोना सेंटर सुरु होण्यास मनावे तश्या हालचाली होत दिसुन येत नसल्याने ना विलाजास्तव कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाना होम आयसोलेशन करण्यात येत असल्याने कोरोना रुग्णात चिंतेचे वातावरण दिसुन येत आहे.
देवणी शहरात गेल्या दहा ते बारा दिवसात कोरोना सर्वत्र पसरताना दिसुन येत आहे. सद्या अँटीजिन टेस्ट व आरटीपीसिआर या दोन्ही टेस्ट आरोग्य विभागाकडून करण्यात येत असल्यातरी काही व्यापारी व सर्वसामान्य नागरिक अँटीजेन टेस्ट केले तरी किंवा अँटीजेन टेस्ट एवजी आमची आरटीपिसिआर टेस्ट करा अशी मागनी लावून धरत असल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात डोकेदुखी होत आहे. देवणी शहर व तालुक्याचा एकूण आकडा 55 पार केला आहे. हा आकडा आठ ते दहा , बारा दिवसा मधील आहे . सद्या कोविड सेंटर बंध असल्याने कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्यांना होम आयसोलेशन करण्यात येत आहे.
आता कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याने तात्काळ कोरोना सेंटर सुरु करण्याची आवश्यकता आहे . कोरोना सेंटर सुरु कारण्याच्या हालचाली बाबत व ग्रामीण रुग्णालयातील विविध सुविधाचा आभाव बाबतीत राष्ट्रीय पृथ्वीराज पाटील उर्फ आनंद जीवणे , तर काँग्रेसचे अमित सूर्यवंशी यांनी देवणी ग्रामीण रुग्णालयला टाळे ठोकन्याचा इशारा दिला असता ग्रामीण रुग्णालयात औषध पुरवठा सुरुळीत सुरु झाला तर ग्रामीण रुग्णालंय परिसरात मरक्युरि लावण्यात आलेले असलेतरी नेकनाळ रोड लगत असलेले शासकीय वासतिगृहात पूर्वरत कोरोना सेंटर उभारण्यात यावे अशी मागणीही शहरांसह देवणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा