डॉ.शंकररावजी चव्हाण शारदा धनवर्धिनी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड: कै.डॉ.शंकरराव चव्हाण शारदा धनवर्धिनी सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन प्रा.संतोष देवराये यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन संपन्न झाली.
या प्रसंगी उपाध्यक्ष श्री किशोरसिंह ठाकूर, संचालक श्री संतोष मोरे सर,कर्मचारी श्री प्रकाश कोरके उपस्थित होते.
पतपेढीच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाइन सभा संपन्न झाली.पदाधिकारी, संचालक आणि सभासदांच्या उत्तम सहकार्याने ही ४२ वी सर्वसाधारण सभा कमालीची यशस्वी झाली.असे मत पतपेढीचे चेअरमन प्रा.संतोष देवराये यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा