माढा शहरातील चव्हाण कॉम्प्लेक्समध्ये एस.के.ई.टेंडरचे झाले उद्घाटन
आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते व सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या उपस्थितीत
माढा तालुका प्रतिनिधी/ रेणुका राजपूत
- माढा ते सोलापूर या मुख्य रोडजवळच्या माढा शहरातील चव्हाण कॉम्प्लेक्समध्ये एस.के. ई टेंडर सर्व्हिसेसचे उद्घाटन माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते व पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी करण्यात आले.
माढयातील चव्हाण काॅम्पलेक्समध्ये एस. के. टेंडर सर्व्हिसेसचे उद्घाटन झाल्यामुळे या एस. के. टेंडर सर्व्हिसेस मध्ये डी. एस. सी. काढणे, ई टेंडर भरणे व इतर ऑनलाईन कामे करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.यावेळी ग्रामसेवक संजय क्षिरसागर,चंद्रकांत कांबळे, आदित्य भांगे, माढा प्रेस क्लबचे संस्थापक-अध्यक्ष किरण चव्हाण, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तथा आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, पत्रकार हिम्मत जाधव,रविंद्र शिंदे,नितीन मराठे,रविंद्र चव्हाण उपस्थित होते. ग्रामीण भागात डी.एस.सी. काढणे व इ टेंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने बांधकाम क्षेत्र, सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार, तलाठी यांच्यासह शासकीय व प्रशासकीय कामकाज करणारांची चांगली सोय झाली आहे त्यामुळे याचा फायदा सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा