Breaking

शनिवार, २७ मार्च, २०२१

टेंभुर्णीच्या सुप्रिया गंभिरे यांची , पुणे प्रादेशिक परिवहन ( आर टी ओ ) येथे नियुक्ती*




*टेंभुर्णीच्या सुप्रिया गंभिरे यांची , पुणे प्रादेशिक परिवहन ( आर टी ओ ) येथे नियुक्ती*
  टेंभुर्णी - महाराष्ट्र राज्य सेवा ( एम.पी.एस.सी ) अंतर्गत  परिक्षेतून यश मिळवून सौ.‌सुप्रिया गजानन गंभिरे व कु. सोनिका सुनिल घाडगे या दोन्ही बहिणींची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड झाली. 

   सौ. सुप्रिया गंभिरे यांची आज पुणे प्रादेशिक वाहन कार्यालयात तर कु. मोनिका घाडगे यांची अकलूज कार्यालयात, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून निवड झाल्याचे पत्र मिळाले असून लवकरच कामावरती रुजू होतील.
      
    यावेळी डॉ विनायक गंभिरे, पोलिस हवालदार श्री. गणेश शिंदे , श्री डी बी गायकवाड सर यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा