Breaking

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

कोरोनाला रोखण्यासाठी दरूजमध्ये ५ मे पर्यंत जनता कर्फ्यू*



*कोरोनाला रोखण्यासाठी दरूजमध्ये ५ मे पर्यंत जनता कर्फ्यू*


वडूज : शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बधांचे काही नागरीकांकडून पालन होत नसल्याने दरूज ता.खटाव येथे गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या वाढत्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत कृती समितीने बुधवार ता.२८ एप्रिल ते बुधवार ता.५ मे पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
       गेल्या १५ दिवसापासून दरूज व दरुज परिसरातील कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत चाललेली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रादुर्भावाला गांभिर्याने घेण्यासाठी राज्य शासनाकडून काही निर्बंध लादण्यात आले आहेत. त्या अनुषंगानी खबरदारीचा उपाय म्हणून दरूज गाव आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय दरुज ग्रामपंचायत कृती समितीने घेतला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा