प्रशासकीय कार्यालयात काही पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना मिळत आहे हप्ता?
श्रीगोंदा:प्रतिनिधि, नितीन रोही
तालुक्यातील काही प्रशासकीय कार्यालयात बहुतांश कामे अनधिकृत पद्धतीने चालत असलेले काही पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या कार्यपद्धतीचे बिंग फुटु नये, या उद्देशाने हप्ते दिले जात असलेबाबत माहिती समजली आहे. पत्रकारितेच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या या तोतय्या पत्रकारांमुळे पत्रकारिता क्षेत्र तालुक्यात बदनाम होत चालले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना, वकिलांना धमकावणे व मलिदा गोळा करणे अश्या गैर कारभारामुळे या पत्रकारांच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील शनि चौक परिसरात पोलिस स्टेशन कार्यक्षेत्राच्या जवळ असलेल्या एका कार्यालयामध्ये दर सोमवारी हा व्यवहार आटोपला जात असल्याची चर्चा समोर येत आहे. या कार्यालयामध्ये तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जनता येत असून, नमूद ठिकाणी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. या प्रशासकीय प्रक्रियेमध्ये काही चुकीच्या पद्धतीने कारभार चालत असल्याने, स्वतःस दक्ष समजणाऱ्या काही पत्रकारांचे या कार्यालयातील गैरकारभारावर लक्ष असते. त्यामुळे नमूद प्रशासकीय अधिकारी दर सोमवारी हप्ता बांधून त्यांचे तोंड बंद करत असलेबाबत चर्चा सार्वत्रिक ऐकण्यात येत आहे.
नेमके हे प्रशासकीय कार्यालय कोणते ? हे अनेकांना समजून आले असेल. मात्र, काही पत्रकारांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या चुकीच्या वृत्तीमुळे पत्रकारिता सह समाजकार्य बदनाम होत असून, पत्रकारिता हा व्यवसाय करू पाहणाऱ्या या टवाळखोरांना याबाबत प्रशासनाने चाप देणे गरजेचे झाले आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही देणार असल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी पाठपुरावा करत असल्याचे काही नागरिकांचे मत आहे.याबाबत माघील काही दिसापूर्वी बहुजन समाज पत्र या ऑनलाइन पोर्टल वर बातमी करून सुध्दा कोणत्याही अधिकारी,कार्यकर्ते, पत्रकार यांना फरक पडताना दिसत नाही, म्हणून नागरिकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा