Breaking

मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

व्यापारी गाळे व फळ भाजीपाला मार्केटचा शुभारंभ मा. आ. अमरसिंह पंडित यांच्या हस्ते*



*व्यापारी गाळे व फळ भाजीपाला मार्केटचा शुभारंभ मा. आ. अमरसिंह पंडित यांच्या हस्ते*
बीड जिल्हा प्रतिनिधी-- नवनाथ आडे

 व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही बाजारसमितीच्या माध्यमातून दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती, गेवराईच्या व्यापारी गाळे व फळे-भाजीपाला मार्केट बांधकामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
शेतकरी व्यापारी बांधवांना या ठिकाणी आपला शेतीमाल आणि फळ-भाजीपाला थेट विक्री करण्यासाठी याचा फायदा होणार असून आज या ठिकाणी शुभारंभ होत असलेल्या एकूण ११ कोटी ४३ लाख रुपये किंमतीच्या या कामामध्ये मुख्य महामार्गावर व्यापारी गाळे, १ हजार मे.टन क्षमतेचे गोदाम, शेतकरी सभागृह, लिलाव शेड, सौर पथदिवे, कंपाऊंड वॉल, कार्यालयीन इमारत, भुईकाटा फाऊंडेशन, मुख्य प्रवेशद्वार आदी कामांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, उप सभापती शामराव मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोशल डिस्टनिंग राखून उपस्थित होते. सदरील कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा