Breaking

मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

महात्मा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे गरिब व निराधारांना मदत


महात्मा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे गरिब व निराधारांना मदत

परभणी जिल्हा प्रतिनिधी./राजकुमार मुंडे

महात्मा ज्योतिबा फुले व महामानव विशवरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त,   पोलीस मित्र परिवार समन्यवय समितीच्या वतीने मा.डॉ.संघपाल उमरे-महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,मा.विनोद पत्रे-महाराष्ट्र राज्य सचिव, सुभाषजी सोळंके-महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार,मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष-मा.सौ.रेखा ताई मनेरे मा.अहमद अन्सारी-प्रदेश संघटक, मा.शेख अजहर हादगावकर-मराठवाडा अध्यक्ष,मा.माधुरी गुजराती मँडम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,मा.हाजी असलम सय्यद व इतर सर्व वरीष्ठाच्या नेतृत्वाखाली,गोदावरी दुधना साखर कारखाना पाथरी येथे ऊस तोडी कामगार महिला यांची वस्तीवर जाऊन भेट घेऊन त्यांना धान्य किट वाटप करण्यात आली गहु,तांदूळ,चना दाळ,तुर दाळ,मसुर दाळ,साखर बिस्कीट पुडे व इतर सर्व ग्रह उपयोगी वस्तू चे वाटप करण्यात आले लाँकडाऊन काळात एक मदतीचा हात म्हणुन समाजातील गरीब गरजु निराधार विधवा महिला ज्यांचा जगण्याचा आधार फक्त मजुरी आहे मजुरी शिवाय कोणताही रोजगार व आधार नसल्यामुळे बऱ्याच कुटुंबियांवर व कुटुंबीयातील लहान-मोठ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे समाजाचा एक घटक म्हणुन एक सामाजिक बांधिलकी,जबाबदारी म्हणुन पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे मराठवाडा महिला विभाग प्रमुख मा.सौ.रेखा ताई मनेरे,सौ सुमनबाई साळवे मुक्ताबाई डोंगरे सुशिलाबाई मनेरे यांच्या प्रमुख उपस्थित धान्य किट वाटप करण्यात आली या प्रसंगी शेख ईफत्तेखार बेलदार,रईस खुरेशी मोहन जोशी शेख हुमायून भारत घांडगे,रेशमा कोल्हे,व पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे मराठवाडा विभाग, परभणी जिल्हा,पाथरी तालुका पदधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला.अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची असा आगळा-वेगळा उपक्रम राबवुन जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी सर्व कामगार महिलांशी संवाद व सखोल चर्चा करण्यात आली.सर्व ऊसतोड  कामगार महिलांनी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे आभार मानले व परिसरातही या कार्याचे कौतुक केले जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा