Breaking

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

होर्टी येथे अवकाळी पावसाचा तडाखा ; वीज पडून दोन म्हशी जागीच ठार*



*होर्टी येथे अवकाळी पावसाचा तडाखा ; वीज पडून दोन म्हशी जागीच ठार* 
सलगरा, प्रतिनिधी / प्रतिक भोसले

तालूक्यात काही दिवसापासून तापमानात वाढ झाली असून संध्याकाळच्या सुमारास काही भागात अवकाळी पाऊस झाला, तसेच वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली असुन, द्राक्षे व आंब्याचे मोठे नुकसान सुद्धा झाले आहे.

तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे रविवार दि.२५ रोजी संध्याकाळी ५  वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटा बरोबरच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदारपणे झोडपुन काढले, या वेळी वीज पडुन दोन म्हशी जागीच मृत्युमुखी पडल्या. 

या झालेल्या पावसामुळे परिसरातील फळ बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीज कोसळून होर्टी येथील रहिवाशी श्रावण कांबळे यांच्या शेतात झाडाखाली बांधलेल्या दोन म्हशी जागीच ठार झाल्या आहेत.  

होर्टी गावच्या परिसरात द्राक्ष, आंब्याचे नुकसान झाले असुन एकीकडे कोरोनाची महामारी चालु असताना दुसरीकडे निसर्गाच्या अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा