*बार्शीपुत्र विनोद कांबळे यांच्या*
*कस्तुरीला राष्ट्रीय पुरस्कार*
बार्शी प्रतिनिधी सिद्धेश्वर जाधव
----------------------------------------
यंदाच्य 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. त्यामध्येही बार्शीची सरशी पाहायला मिळाली. बार्शीपुत्र विनोद कांबळे यांच्या कस्तुरी या बालचित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.त्याबद्दल बार्शी तालुका फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशन यांच्या वतीने आज दि 1एप्रिल 2021 रोजी. सकाळी ठिक 10 वाजता बार्शी तालुका फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशन यांच्या कार्यालय सोलापूर रोड हूमा मेडीकल शेजारी या येथे गौरव सोहळा पार पडला.यावेळी सर्व कलाकार दिग्दर्शक व सर्व टीमचा सन्मान पत्र देउन जमीर कुरेशी अध्यक्ष
वैभव कांबळे उपाध्यक्ष
राम नवले सचिव
अभिषेक राऊत सहसचिव
रोहित दीक्षित खजिनदार व प्रवीण थोरात ओवेस सौदागर यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. आभार साजिद बागवान याणी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा