Breaking

शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

सावत्र आई आणि भावाने केला भावाचा निर्घुन खुन**गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील घटना गेवराई पोलीसांत गुन्हा दाखल*

सावत्र आई आणि भावाने केला भावाचा निर्घुन खुन*

*गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील घटना  गेवराई पोलीसांत गुन्हा दाखल*

बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे

गेवराई ( प्रतिनिधी दि ९ ):-  तालुक्यातील लुखामसला याठिकाणी सहन जागेच्या वादातुन सावत्र आई आणि भाऊ यांच्यासह एकाने मिळुन आपल्या पतीच्या डोक्यात कु-हाड मारुन त्याला ठार मारले असल्याची फिर्याद सुनाने गेवराई पोलीसांत दिली आहे सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .

     या बाबद सविस्तर माहीती अशी की , तालुक्यातील लुखामसला याठिकाणी रहिवासी असलेले भगवान डोमाळे यांना दोन पत्नी असुन त्यांना एकुण सात आपत्य आहेत यापैकी पाडूरंग भगवान डोमाळे ( वय ३८ वर्ष ) यांचा डोक्यात कु-हाड घालुन त्याला ठार मारले असल्याची फिर्याद त्यांची पत्नी उर्मिला डोमाळे यांनी पोलीसांत दिली आहे त्यांच्या तक्रारीवरूण सासु रेणुका भगवान डोमाळे ( वय ५० वर्ष ) दिर वैजिनाथ भगवान डोमाळे ( ४० वर्ष ) पुतण्या योगेश वैजिनाथ डोमाळे ( वय २० ) यांच्या विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे हे करत आहेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा