तुळजापूर शहरातील समस्त व्यापारी यांनी लॉकडाऊन बाबत दिले तहसीलदार यांना निवेदन*
तुळजापूर तालुका प्रतिनिधी/ रुपेश डोलारे उस्मानाबाद
दि 7-4-2021 रोजी सकाळी 11वाजता तुळजापूर मधील समस्त व्यापार्यांनी तहसिलदार यांना लाँकडाऊन बाबत निवेदन दिले सदरील निवेदना मध्ये सद्य परस्थितीला सर्वत्र लाँक डाऊन केल्या बबतचा निषेद व्यक्त करण्यात आला. तसेच सदरील बंद बाबत शासनाने योग्य तो निर्णय सर्वांच्या हिताचा घ्यावा असे निवेदनात नमुद करण्यात आले.व्यापार्यांसमवेत नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनीही सदरील निवेदना बाबत राज्यशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा तसेच मंदीर बंद असल्या कारणाने शहरवाशी,व्यापारी,पुजारी बांधवांवरती उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे शासन स्तरावरती या लाँक डाऊनचा पुन्शच विचार व्हावा अशी आग्रहाची मागणी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी घेतली व्यापार्यांच्या या निवेदना वेळी भाजपा पदाधिकारी यांनी सदरील निवेदनास भाजपाचा पाठींबा दर्शिवला. या वेळी आनंद कंदले,गुलचंद व्यवहारे,सागर कदम आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
प
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा