*राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्राची चमकदार कामगिरी*
दरूज ( ता.खटाव ) येथील श्रवण लावंडला दोन रौप्य पदके
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या नवव्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने चमकदार कामगिरी केली आहे. सर्व खेळाडूंचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
श्रीनगरच्या इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम पोलो ग्राऊंड येथे हि स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. स्पर्धेत देशभरातून ३५ राज्यातील दोन हजार चारशे खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील खेळाडूंनी १० सुवर्ण, ९ रौप्य आणि ३२ कांस्य अशी एकूण ५१ पदके जिंकून तृतीय चषक पटकाविला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून खेळणारा खटाव तालुक्यातील दरूजचा श्रवण सचिन लावंड यांने लौकिकास साजेसा खेळ करीत स्टॅडींग फाईट प्रकारात आणि तुंगल ( सेनी ) प्रकारात दोन रौप्यपदके मिळविली. किर्णाक्षी किशोर येवले हिने दोन सुवर्ण पदके, अंशुल कांबळे ने एक सुवर्ण व एक रौप्यपदक, आणि यश चिकणे व स्वयंम पाटील यांनी प्रत्येकी एक कांस्य पदक मिळविले. या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षिस वितरण इंडियन पिंच्याक सिलॅटचे अध्यक्ष किशोर येवले यांच्या हस्ते करण्यात आले.
रौप्य पदक विजेता श्रवण लावंड याचे दरूजच्या सरपंच नंदा खामकर, उपसरपंच रोहित लावंड, कॅप्टन आनंदराव लावंड, मनोहर लावंड, मधुकर लावंड, किसन लावंड, सुरेश सिताराम लावंड, गोरख लावंड आदिसह दरूज परिसरातील मान्यवर, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा