विठ्ठलवाडीच्या विठ्ठल सार्वजनिक वाचनालयात आंबेडकर जयंती साजरी
माढा / प्रतिनिधी-रेणुका रजपूत
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती 14 एप्रिल रोजी माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील शासनमान्य श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयात उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे व संचालक नेताजी कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सर्वांनी शासनाच्या कोरोना संदर्भातील आदेशांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन केले.माझे गाव कोरोनामुक्त गाव व कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरविले.नागरिकांनी शासनाच्या धोरणानुसार लॉकडाऊन बाबतीतचे नियम पाळणेबाबत जनजागृती केली.
यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भांगे,माजी अध्यक्ष तथा आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर, पतसंस्थेचे उपाध्यक्ष नारायण खांडेकर,पोलीस पाटील बालाजी शेगर,अविनाश माने,सतीश गुंड, भिवाजी जाधव,अमोल जाधव,धनाजी शेंडगे,भिमराव नागटिळक,रविंद्र शेडगे,शिवाजी खरात,रामलिंग सस्ते, सुरेश शेगर,सुरज शेंडगे,जयराम भिसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी- विठ्ठलवाडी ता.माढा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे,नेताजी कदम व इतर मान्यवर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा