Breaking

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

बेंबळे येथे ग्रीन व्हिलेज फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन..



बेंबळे येथे ग्रीन व्हिलेज फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन..
बेंबळे प्रतिनिधी/सज्जन शिंदे 
बेंबळे प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्यात सद्या कोरोना विषाणु संसर्गाची परिस्थिती अत्यंत भयावह असून , राज्याच्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्ताचा तुटवडा असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या आवहानास प्रतिसाद देत, बेंबळे येथिल सामाजिक संस्था ग्रीन व्हिलेज फाउंडेशन यांच्या वतीने महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. 

सदरप्रसंगी छत्तीसगढ येथे नक्षली हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पन करून रक्तदान शिबीराचे उद्घाटन सरपंच विजय पवार व उपसरपंच नाना भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरादरम्यान ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून महात्मा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

दरम्यान कृषी अधिकारी हनुमंत भोसले यांनी आपल्या वडीलांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या खर्चाला फाटा देत ग्रीन व्हिलेज फाऊंडेशन मार्फत चालणाऱ्या वाचनालयास पुस्तके खरेदीस २५ हजार रूपयांचा धनादेश देवून मदत केली. यावेळी गोविंद भोसले, मा. सरपंच कैलास भोसले,  ग्रामपंचायत सदस्य संजय पवार, नागेश मस्के,  लक्ष्मण भोसले, जयवंत भोसले, प्रा. मोहन भोसले, प्रा. लक्ष्मण भोसले आदींसह रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरप्रसंगी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रीन व्हिलेज फाऊंडेशन च्या  सर्व  सदस्यांनी परीश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा