Breaking

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

*श्री गणपती फार्मसीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*

श्री गणपती फार्मसीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी* 
टेंभुर्णी प्रतिनिधी अमोल भोसले

अकोले खुर्द (ता.माढा) येथील श्री गणपती फार्मसी कॉलेज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मोहन भोसले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
          प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे जयंती च्या निमित्ताने म्हणाल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला संदेश दिला. तसेच त्यांच्या मनात समाजक्रांतीचे स्फुलींग चेतावले व समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले. डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला अन्यायाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ''शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिणार तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,'' असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत.
         संस्थेचे सचिव डॉ. आर डी बेंदगुडे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जात संघर्ष केला तर यश निश्चित मिळते.
    यावेळी संस्थेचे सचिव डॉ.आर.डी बेंदगुडे ,अध्यक्ष अॅड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्रा. प्रशांत मिसाळ, प्रा. महादेवी भोसले व प्रा. रोहिणी गुटाळ व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा