Breaking

शुक्रवार, १४ मे, २०२१

टेंभुर्णी ते कुसळम या 73 कि. मि. महामार्गास 157 कोटी रुपये मंजूर.... आमदार बबनदादा शिंदे 'ना.नितीन गडकरी यांचेकडे केलेल्या पाठपुराव्यास यश'



टेंभुर्णी ते कुसळम या 73 कि. मि. महामार्गास 157 कोटी रुपये मंजूर....
  आमदार बबनदादा शिंदे        'ना.नितीन गडकरी यांचेकडे केलेल्या पाठपुराव्यास यश'

      बेंबळे। प्रतिनिधी
                           
  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 सी अंतर्गत टेंभुर्णी ते कुसळम या तीनपदरी 73 किलोमीटर महामार्ग रस्त्याच्या कामासाठी 157 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मंजूर झाले असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
  टेंभुर्णी ते कुसळम या 73 कि.मी. महामार्गासाठी  निधी मंजूर व्हावा म्हणून आमदार बबनदादा शिंदे यांनी मागील दोन वर्षापासून, केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. माननीय केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी या 73किलोमीटर महामार्ग रस्त्यासाठी सन 2020-21 मधील केंद्रीय आर्थिक नियोजनातून 157 कोटी रुपये मंजूर केले असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांना पत्राद्वारे कळवले आहे.
      अधिक माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले की मुंबई, पुणे, सातारा, सांगली या भागातून मराठवाड्याकडे येण्या-जाण्यासाठी टेंभुर्णी, कुर्डूवाडी, बार्शी, कुसळम हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या कामासाठी सन 2020- 21 मधील केंद्र सरकारच्या आर्थिक नियोजनातून 157 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. हा महामार्ग तीन पदरी होणार असून महामार्गावर 3 मोठे साखर कारखाने तसेच टेंभुर्णी, कुर्डूवाडी, बार्शी यासारखी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची शहरे येत आहेत. या महामार्गामुळे मुंबई, पुणे, सातारा ,सांगली व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वासाठी, मराठवाड्यात येण्या-जाण्यास जवळचा व महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. या कामाची निविदा प्रसिद्ध झालेली असून लवकरच या महामार्गाच्या कामास प्रारंभ होणार असल्याचेही आमदार बबनदादा शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा