*अनधिकृत लॅबवाल्यांचा मुजोरपणा जाईना...प्रशासन घालतंय पाठीशी... आकडेवारी गुलदस्त्यात?*
*पाॅझीटीवह रुग्ण वा-यावर... अनेक भानगडी चव्हाट्यावर...*
*अनधिकृत लॅबवाल्यांच्या तपासण्या बंद करुन कोरोनोलाअटकाव करण्याची आक्रोशी मागणी...कसा होणार कोरोनो व मृत्यूदर कमी?*
*✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे(पत्रकार)यांजकडून...*
*कुर्डुवाडी शहरातील मोकाट सुटलेले अनधिकृत लॅबवाल्यांच्या व संबंधित वैद्यकीय रॅकेटचा गेल्या महिनाभरापासून "विशेष बुलेटिन" मधून आवाज उठविल्यानंतर त्यांच्या अनेक भानगडी चव्हाट्यावर येवूनही त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली जात नसल्याने व उलट त्यांनाच पाठीशी घातले जात असल्याबद्दल नागरिकांत व वैद्यकीय क्षेत्रातही तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.*
*१७ एप्रिल रोजी कोरोनो स्प्रेडच्या पार्श्वभूमीवर प्रथम आवाज उठविल्यानंतर ७२ तासांच्या आत पोलिस खात्याच्या लॅबवरील धाडसत्राने सर्वं वैद्यकीय क्षेत्रच हादरुन गेले होते.*
*पोलिस खात्याच्या लॅबवरील धाडसत्रानंतर प्रशासकीय यंत्रणा चक्रावल्या होत्या व त्या चव्हाट्यावरही आल्या होत्या.*
*त्यानंतर पोलिस यंत्रणेच्या कारवाईच्या दगडाखालील हात काढून घेण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढवून काही प्रशासकीय पत्रांची सारवासारव करण्यात आली.*
*तर कागदोपत्री काही आदेश बासनात गुंडाळण्यासाठी केलेलें प्रयत्नही सततच्या पाठपुराव्यामुळे अयशस्वी ठरले.*
*पोलिस खात्याच्या लॅबवरील धाडसत्रानंतर त्यांनी ह्या प्रकरणाची कसून चौकशी चालूच ठेवलेली आहे.धाडसत्रानंतर अनधिकृत लॅबवाल्यांच्या तपासण्या बंद झाल्यानंतर त्याच व पुढच्या आठवड्यात कोरोनो रुग्णांची संख्या सुमारे निम्म्याने घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले होते.मग पुन्हा कोणाकोणाच्या अर्थपूर्ण व्यवहारातून या चाचण्यांना पाय फुटले याबाबतही खमंग व चविष्ट चर्चा सर्वच क्षेत्रात सुरू आहे.*
*अनधिकृत दोन लॅबवाल्यांचा गैरप्रकार व फक्त त्यांचाच शंभर टक्के पाॅझीटीव्ह रिपोर्ट चव्हाट्यावर आल्यावर तोही एक सर्वत्र संतापजनक चर्चेचा विषय झाला आहे.*
*याप्रकरणी सोलापूर सिव्हील सर्जनच्या कार्यालयाला पोलिस खात्याने प्रश्नावली पाठवून माहिती मागितली आहे.महिना होत आला तरी अद्याप ती कागदपत्री प्रशासकीय पातळीवरून पोलिस खात्याला दिलेली नाही.एवढा विलंब का लावला जात आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरूच आहे.*
*अहवालापूर्वीच क्लिन चिटबाबत मिडीयावर अर्थपूर्ण व्यवहारातून झालेला उहापोहही हास्यास्पद ठरला.*
*उलट आणखी अनेक भानगडी चव्हाट्यावर येतच चालल्याने सर्वच क्षेत्रात उलटसुलट चर्चेचा विषय ठरला आहे.*
*शहरातील कोरोनो सुपर स्प्रेडरला केव्हा कारवाई करण्यात येणार? याबाबत नागरिकां बरोबरच प्रशासकीय,वैद्यकीय क्षेत्रातील विविध स्तरांवर उलटसुलट चर्चांना उधाण आले असून अनेक भानगडी चव्हाट्यावर येतच चालल्याने अनधिकृत लॅबवाल्यांच्या कोव्हीड तपासण्या तातडीने बंद कराव्यात याबाबत सर्वच थरातून मागणी वाढत असून त्वरेने कारवाई करुन शहर कोरोनो मुक्तीसाठी प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचलावीत अशी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांकडूनही रास्त मागणी होत आहे.*
*अनधिकृत लॅबवाल्यांच्या तपासण्या बंद केल्याने तपासण्या बंद होणार नाहीत.उलट शासकीय पातळीवर अन्य दोन अधिकृत लॅब, ग्रामीण रुग्णालय,मराठी शाळा व अॅम्बुलन्सद्वारे तपासण्या व्यवस्थीत व विना तक्रार पार पडणार असल्याचेही उघड उघड वैद्यकीय क्षेत्रातच बोलले जात आहे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा