*अखेर तांबवे गावात लसीकरणास सुरुवात,राहुल खटके व स्वप्नील खटके यांच्या प्रयत्नांना यश..!*
टेंभुर्णी प्रतिनिधी/अमोल भोसले
*तांबवे(टें)-
गावामध्ये कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असतानाच ग्रामस्थांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे.ग्रामपंचायत सदस्य राहुल खटके व स्वप्नील खटके यांच्या अथक प्रयत्नाने गावात लस पोहच झाली असून आता लसीकरणाला वेग येणार आहे.ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांनी अगदी गावाला वाऱ्यावर सोडले होते त्यामुळे शेजारील गावांच्या तुलनेत लसीकरणात तांबवे गाव प्रचंड पिछाडीवर पडले होते.*
*पिंपळनेर येथील सरकारी रुग्णालयात लसीकरण चालू होते पण सत्ताधाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे ग्रामस्थांसाठी लस मिळणं दुरापास्त झाले होते.इतर गावातील पुढारी आपले राजकीय वजन वापरून आपापल्या गावाला लस मिळवून देत होते त्याचवेळी तांबवे गावातील सत्ताधाऱ्यांनी साफ दुर्लक्ष करून गावाला वाऱ्यावर सोडले होते.*
*दरम्यान, विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य राहुल खटके व स्वप्नील खटके यांनी आमदार बबनदादा शिंदे व रणजित भैय्या शिंदे यांच्याशी संपर्क साधून तसेच आरोग्यफ विभागाकडे पाठपुरावा करून गावासाठी लस उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा