Breaking

रविवार, १६ मे, २०२१

टेंभुर्णी चेसामाजिक कार्यकर्ते बशीर जहागीरदार यांचे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन



*टेंभुर्णी चेसामाजिक कार्यकर्ते बशीर जहागीरदार यांचे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  दुःखद निधन


टेंभुर्णी : - येथील आरटीआय कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते बशीर बाबासाहेब जहागीरदार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बार्शी येथे उपचार सुरू असताना रविवारी सकाळी निधन झाले.

बशीर जहागीरदार यांनी टेंभुर्णी शहर व परिसरात अनेक सामाजिक व नागरी सुवेधेची कामे केली होती.त्यांच्या प्रयत्नांनी अनेक कामे मार्गी लागली होती.नागरिकांच्या हक्काच्या लढ्यात ते नेहमी सक्रिय सहभाग घेत होते.टेंभुर्णी शहरातील पाणी पुरवठ्याचा विषय असो वा नवीन पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्याचा विषय असो.यामध्ये त्यांनी झोकून देऊन अनेक बेमुदत उपोषण आंदोलने केली होती.टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावण्यात जहागीरदार यांचा मोठा वाटा होता.यासाठी जहागीरदार यांनी संबंधित खात्यास निवेदने देऊन पाठपुरावा केला होता.मुंबईत मंत्रालय येथे उपोषण आंदोलन केले होते.जहागीरदार यांनी अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कायदेशीर लढाया करून त्या जिंकल्याही होत्या.

बशीर जहागीरदार (वय-५५) यांना तीन दिवसांपूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला होता.त्यासाठी ते बार्शी येथे उपचार घेत होते.त्यातच रविवारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.त्यात त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,एक मुलगा,तीन भाऊ,दोन बहिणी असा परिवार आहे.टेंभुर्णी येथे त्यांचा दफनविधी पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा