*टेंभूर्णीरोडवरील लॅबवाल्यासह रुग्णालयीन कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्णांच्या हिडण्यानेच सुपरस्प्रेड?*
*आणखी एक रुग्ण मारतोय फेरफटका... अन् नागरिकांची धूम... वैद्यकीय क्षेत्रातही गलथानपणा बाबत संताप...कसा होणार कोरोनो कमी?*
*✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे पत्रकार यांजकडून...*
*कुर्डुवाडीतील अनधिकृत व बेकायदेशीर लॅबवाल्यांच्या भानगडी बाहेर यायचे सुरू असताना रुगणालयीन पाॅझीटीव्ह रुग्णही वा-यावर कोरोनो फैलावत असल्याने नागरिकांत आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.*
*कालच्या बुलेटिन मध्यें आंतरभारती मैदानानजीकच्या एका कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्णाच्या रात्रीच्या पाण्याच्या तहानेने सर्वांची पाचावर धारण बसल्याचे प्रसिद्ध होताच आणखी एका रुग्णाच्या फेरफटक्याने नागरिकांनीच धूम ठोकली.*
*वेळ सकाळी पावणे सातची साई काॅलनी मधून एक रुग्ण हाताला असलेल्या सुई-जेल्को सह विनामास्क दवाखान्यातून बाहेर पडला.बगिच्याभोवती फेरफटका मारत मारत त्यानें चक्क् टेंभुर्णी रोड गाठला.*
*त्याची चौकशी केली असता तो शासकीय कर्मचारी असल्याचेही सांगण्यात आले.तो रोडवर येऊन पुढे फिरायला जाणार एवढ्यात लाॅजच्या काॅर्नरला त्यास त्याच्या कार्यालयातील सेवानिवृत्त अधिकारी भेटले.त्यांना लांबूनच संशय आल्याने त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा त्यास थांबण्यास सांगितले.चौकशी केली असता मी रुग्णालयात तीन दिवसांपासून दाखल असून मी कोरोनो पाॅझीटीव्ह असल्याचे सांगून हाताचा जेल्को दाखवत त्याने फेरफटका मारत हवा खायला आल्याचे सांगितले.*
*त्यास दूरच उभे रहाण्यास दरडाऊन सांगत बाहेर कशासाठी आला तर फिरायला आल्याचे सांगितले.वृध्द कर्मचाऱ्यांने घाबरतच तेथून धूम ठोकली... बिच्चारा म्हणाला...नशीब माझं लय दिवसांत भेटला म्हणून हातात हात दिला नाही किंवा गळाभेट केली नाही*
*ह्या बहाद्दराने आंतर भारती मैदानाच्या फेरफटक्यानंतर पुन्हा विनामास्कच दवाखाना गाठला.अन इकडे माजी गर्भगळीत अधिका-यानी घर गाठून सुटकेचा निःश्वास सोडला.*
*याबाबत परिसरातील नागरिकांनीच कालच्या "बुलेटिन पर्दाफाश" केल्यानंतर प्रतिनिधींशी संपर्क साधून हिडणारे रुग्ण, दवाखान्यातील वाढत्या रुग्ण मृत्यूने रात्री अपरात्री वाजणारा अॅम्बुलन्सचा सायरन, नातेवाईकांचा टाहो, रुग्ण बरा होवून जाताना वाटेत त्यानें कपड्यासह टाकलेल्या वस्तू, सार्वजनिक बगिचाची दुर्गधियुक्त झालेली कचराकुंडी याबाबत परिसरातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनालाही सांगून काही उपयोग होत नसल्याने जिव मुठीत धरून जीवन जगत असल्याचे सांगितले.*
*टेंभूर्णी रोडवरील बेकायदेशीर व अनधिकृत लॅबवाल्यांने अनेक गैरकृत्ये करून कांही खाजगी डॉक्टरांना व अधिका-यांना हाताशी धरून आठ आठ दिवस कोरोनो पाॅझीटीव्ह रिपोर्ट दडवून ठेऊन कोरोनो स्प्रेडला सर्वांनी चांगलाच हातभार लावल्याचे चव्हाट्यावर आले आहेच.*
*त्यात कमतरता होती म्हणून की काय सिरियस म्हणून दाखल रुग्ण रस्त्यावर हिंडण्यासाठी त्याला बळ कुठून येते?व हिडतोच कसा याबाबत नागरिकांनी कथीत तीन दिवसांपूर्वीची अनेक चर्वितचर्वण सांगावे तेवढे थोडेच आहे.*
*अनधिकृत व बेकायदेशीर लॅबवाल्याच्या काही डॉक्टर्सच्या रॅकेटचा पर्दाफाश होऊनही प्रशासन घालतंय पाठीशी मग कोरोनो कसा कमी होणार?*
*रुग्ण वा-यावर...पैसा जातोय जिवानिशी... अन् निर्ढावलेल्या वैद्यकीय रॅकेटने नागरिक भयभित आणि संतापजनक भावना व्यक्त केल्या जात आहेत.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा