नाना काळभोर यांचे दुःखद निधन
बेंबळे ।प्रतिनिधी
बेंबळे-घोटी शिवेवर रहिवासी असलेल्या नाना हनुमंत काळभोर (पील्लू); वय 37 ,यांचे रविवार दिनांक 9 मे रोजी सायंकाळी पाच वाजता टेंभुर्णी येथील माने हॉस्पिटलमधे दुःखद निधन झाले. नाना ऊर्फ पिल्लू काळभोर याचे वर टेंभुर्णी येथे कोरोना रोगावर उपचार चालू होते., एक-दोन दिवसात तो बरा होईल असा डॉक्टरना विश्वास होता. परंतु अतिशय भयभीत झाल्यामुळे त्याचे रविवारी सायंकाळी निधन झाले. घोटी आणि बेंबळे गावच्या सीमेवर त्यांचे घर आणि मोठी बागायत शेती आहे. शांत, नम्र आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे नाना काळभोर सर्वत्र लोकप्रिय होते. मागील दहा वर्षापासून घोटी ग्रामपंचायतीच्या सदस्या असलेल्या श्रीमती गोजरबाई हनुमंत काळभोर यांचा तो एकुलता एक मुलगा होता .त्याचे पश्चात आई, वडील, पत्नी, तीन लहान मुली व एक लहान मुलगा असा परिवार आहे. त्याच्या निधनामुळे बेंबळे आणि घोटी परीसरात शोककळा पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा