Breaking

मंगळवार, २५ मे, २०२१

तांबवे गावचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्राचार्य मारुती खटके यांचे दुःखद निधन*




*तांबवे गावचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्राचार्य मारुती खटके यांचे दुःखद निधन*
टेंभुर्णी प्रतिनिधी/AJ 24 Taas News

 तांबवे गावचे तंटामुक्त समितीचे मा.अध्यक्ष व निवृत्त प्राध्यापक मारुती भगवान खटके (सर) यांचे आज दि. 25 मे 2021 रोजी दुःखद निधन झाले.
तांबवे गावचे मा.सरपंच स्व. भगवान आबा खटके यांच्या पोटी जन्मलेल्या नवरत्ना पैकी आज दूसरे रत्न निखळले..मारुती खटके सर यांनी तांबवे  गावातील पाहिले पदवीधर होण्याचा मान मिळवला होता.. आपल्या शालेय जीवना पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात हिरीरीने भाग घेऊन महाराष्ट्र भर मित्रांचा मोठा गोतवळा निर्माण केला आहे.. तांबवे गावच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.. माझ्या कुटुंबाच्या सामाजिक राजकिय कारकिर्दी साठी त्यांचा मोलाचा हातभार होता... माझ्या राजकिय व सामाजिक कार्यास सुरुवात करण्यासाठी खर्या अर्थाने मारुती खटके सर प्रेरणास्रोत होते. त्यांच्या जाण्याने तांबवे गावावर शोककळा पसरली आहे... तांबवे गावचे स्वाभिमानी, बुद्धिमान, अभ्यासू, उमदे व संवेदनशील नेतृत्व हरपल्याने मोठी पोकळी तांबवे गावात निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा