Breaking

शनिवार, २९ मे, २०२१

सुरभी संस्था अलिबाग व ग्राम परिवर्तन संस्था कटगुण मार्फत बुधच्या आयसोलेशन सेंटरला विशेष मदत*



*सुरभी संस्था अलिबाग व ग्राम परिवर्तन संस्था कटगुण मार्फत बुधच्या आयसोलेशन सेंटरला विशेष मदत* 
वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

  .        सुरभी संस्था अलिबाग व ग्राम परिवर्तन संस्था कटगुण यांच्या मार्फत बुध ता.खटाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने श्री . नागनाथ विदया मंदिर येथील आयसोलेशन सेंटरला विशेष मदत  दिली आहे .  
               बुध ता. खटाव येथील  ग्रामपंचायतीच्या मॉडेल आयसोलेशन सेंटर मधील सुमारे ५० पेक्ष्या अधिक कोविड रूग्णांना सुरभी संस्था अलिबागच्या सौ. सुप्रिया जेधे, यांच्या मार्गदर्शनात ग्राम परिवर्तन संस्था कटगुण यांचे सहयोगाने व प्रताप गोरे  यांच्या सहकार्याने बुध येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रकाश राजेघाटगे, सरपंच अभयसिंह राजेघाटगे व अनिल किर्वे, होमगार्ड सुरेंद्र काटकर यांचे मार्गदर्शनाखाली मास्क,  सॅनिटायझर, लाईफ बॉय जंतू नाशक साबण किट, बिस्कीट पुडे, कोरोना जागृती पत्रक, व कोरोना विषयी जनजागृती इ, माहिती देण्यात आली, सदर मदत दिल्याने डॉ.सोनाल जाधव यांचे आशाआरोग्य सेविका, ग्रामस्थ यांनी प्रेरणादायी सेवा सहयोग म्हणून आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा