Breaking

रविवार, १६ मे, २०२१

खटाव तालुक्यातील भुरकवडीमध्ये सर्वप्रथम दुसरे लसीकरण*



*खटाव तालुक्यातील भुरकवडीमध्ये सर्वप्रथम दुसरे लसीकरण*
वडूज : भुरकवडी ता. खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कोव्हिड लसीकरणाचा दुसरा डोस देण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. मंत्रालयातील स्विय सहाय्यक पदावर असलेले प्रविण लावंड यांच्या सहकार्याने व तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.युनुस शेख, आरोग्य सेविका स्मिता जंगम यांच्या मदतीने हे लसीकरण पार पडले. या लसीकरणाचा शुभारंभ सरपंच ललिता कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ.युनुस शेख, डॉ. निखिल लोंढे, डॉ. रणदिवे, मा.सरपंच शिवाजीराव कदम, ग्रामसेविका धनश्री गमरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
           शासन नियमानुसार खटाव तालुक्यातील प्रथमता भुरकवडीमध्ये दुसरे लसीकरण पार पडले असून नागरिकांनाही चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये १५० लसीकरण डोस उपलब्ध झाले होते. १२३ लोकांना लसीकरण करण्यात आले. भुरकवडी मधील १०४, वडूज, सातेवाडी, वाकेश्वर व कुरोली येथील १९ लोकांना लसीकरण करण्यात आले. या लसीकरणा वेळी ऑनलाईन प्रोसेस पूर्ण करण्याकामी अनिकेत जाधव व निशांत नवले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
       यावेळी आरोग्य सेवक निलेश राऊत, शिवाजी काळे, आशा स्वयसेविका रेश्मा फडतरे, सिमा जाधव यांच्या मदतीने लसीकरण पार पडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शरद कदम यांनी केले तर आभार प्रविण कदम यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा