Breaking

सोमवार, १७ मे, २०२१

चक्क गायचे घातले डोहाळे जेवण या अभिनव उपक्रमाचे सर्वांकडून स्वागत*


*चक्क गायचे घातले डोहाळे जेवण या अभिनव उपक्रमाचे सर्वांकडून स्वागत*



वडूज प्रतिनिधी / शरद कदम  

           मुक्या प्राण्यांवर स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करणारे अनेक कुटुंबे आहेत. परंतु त्या मुक्या प्राण्यांनाही भावना असतात त्यांचे सुद्धा सुखाचे क्षण हे कार्यक्रम करून साजरे करावेत ही भावना जाणून वडूज येथील गोडसे कुटुंबाने देशी गाईचे डोहाळे जेवण घातले.
          याबाबत अधिक माहिती दिली अशी की,हिंदू धर्मात गाईला देव मानले जाते. वडूज येथील चिरमूल्याचे व्यापारी रामचंद्र शंकर गोडसे हे यांच्या घराशेजारी असणाऱ्या गोट्यात गौरी नावाची एक देशी गाय आहे. तिची देखभाल गोडसे कुटुंबिय घरातील सदस्याप्रमाणे करत असतात. गौरी ही गाय तीन वर्षाची असून तिला नववा महिना चालू आहे. याचे औचित्य साधून गोडसे कुटुंबीयांनी कोरोना शासन नियमाचे पालन करत घरगुती पध्दतीने गाईचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पाडला.
       या आगळ्यावेगळ्या डोहाळे जेवणासाठी गाईला आकर्षक असे सजवण्यात आले होते. तर फराळाचे सर्व साहित्य ठेवण्यात आले होते. याशिवाय पुरण पोळीचे जेवण करण्यात आले होते. गोडसे परिवातील महिलांनी परंपरेनुसार गौरी गाईची ओटी भरून कार्यक्रम पार पाडला. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे वडूज परिसरात कौतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा