Breaking

मंगळवार, २५ मे, २०२१

सलगरा दिवटी येथील श्री शंभु महादेवाची यात्रा यंदा साधेपणाने होणार साजरी*



*सलगरा दिवटी येथील श्री शंभु महादेवाची यात्रा यंदा साधेपणाने होणार साजरी*

सलगरा / प्रतिनिधी - प्रतिक भोसले
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील श्री शंभु महादेवाची यात्रा  साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे, तसेच बाहेरून येणार्‍या भाविक, भजनी मंडळे, व्यापारी, संप्रदायिक मंडळी आणि पाहुणे मंडळींना यात्रेत सहभागी होण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती लोकप्रतिनिधी आणि श्री शंभु महादेव यात्रा कमिटीने दिली आहे.

 मात्र कोरोनामूळे यंदाची यात्रा गजबजलेली, जल्लोषात साजरी न करता साधेपणाने करण्यात येणार आहे. तसेच मंदिरामध्ये यात्रा काळात होणारे धार्मिक विधिवत पूजा कार्यक्रम मात्र केले जाणार आहेत. शासनाने आखून दिलेल्या कोरोनाच्या नियमांचे पालन करून ही यात्रा मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तरी बाहेरून येणारे भाविक, व्यापारी, पाहुणे आणि आजूबाजूची मंडळी यांनी यात्रेत प्रत्यक्ष सहभागी न होता सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा