Breaking

गुरुवार, १० जून, २०२१

सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हददीतल चोरीचा गुन्हाचा उकल 12 तासाच्या आत करून 1 लाख 93 हजार रू. किमतीचा मुददेमाल हस्तगत


*सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हददीतल चोरीचा गुन्हाचा उकल 12 तासाच्या आत करून 1 लाख 93 हजार रू. किमतीचा मुददेमाल हस्तगत* 
 
सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हददीतुन तक्रारदार महिला हया रिक्षा मधुन कोंडी ते एम.आय.डी. सी पाकणी असा प्रवास करत असताना अज्ञात महिलेने त्यांच्या पर्स मधुन 1,60,000/- रू चे दागीने तसेच 42,500/- रोख रक्कम यातील अनोळखी चोरट्या महिलेने चोरून नेले म्हणुन वगैरे दिले फिर्यादी वरून गु.र.न. 411/2021 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन श्री. प्रभारकर शिंदे, एस.डी.पी.ओ. सोलापूर विभाग सोलापूर व पो.नि. फुगे यांनी आनोळखी महिला आरोपीचा शोध घेण्याकरीता सोलापूर तालुका पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले होते. आरोपींचे गुन्हे करण्याच्या पद्धतीवरून संशयित आरोपी मिळुन हि मुळेगाव शिवारामध्ये आल्याने तीच्याकडुन गुन्हयात चोरलेला मुददेमापैकी *सर्व दागीने (1,60,000/- रू) तसेच 33,000/- रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहे*. गुन्हयाचा अधिक तपास सपोफौ बाळु राठोड हे करत आहेत. 

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर श्री. प्रभाकर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अरूण फुगे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे, सपोनि नेताजी बंडगर, मसपोनि माधुरी तावरे, सपोफौ बाळु राठोड, सपोफौ सांजेकर सांपोहेकाॅ/ शिशी शिंदे, पोहेकाॅ/फयाज बागवान, पोहेकाॅ सुनिल बनसोडे, पोना. श्रीराम आदलींग, मपोहेकाॅ वैषाली कुंभार,  मपोना/सरस्वती लोकरे, मपोना/ सुनित चवरे, पोकाॅ. असिफ शेख, पोकाॅ देवा सोलंकर, पो.काॅ. किशोर सलगर, पो.काॅ अशोक खवतोडे, पो.काॅ. राजु इंगेळ, पो.कॉ. अनिस शेख यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा