दुध दर वाढ मागणी संदर्भात गुरुवारी रयत क्रांती संघटना जिल्हाभर आंदोलन करणार. प्रा सुहास पाटील.
कन्हेरगाव (प्रतिनिधी)राजेंद्र केदार
राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला दर वाढ मिळण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर महाआघाडी सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा सुहास पाटील यांनी दिली.
कोरोना महामारीने शेतकरी ग्रस्त असताना त्याच्या दुधाला आज १८ ते २० रुपये एवढा कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कौटुंबिक उदरनिर्वाह कोलमडला आहे. दूध व्यवसाय अडचणीत आला असून महाआघाडी सरकारने गाईच्या दुधाला ३० रुपये आणि म्हशीच्या दुधाला ५० रुपये प्रति लिटर दर द्यावा या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण जिल्हाभर रयत क्रांती संघटना आंदोलन करणार आहे.
सध्या पशुखाद्याचे दर गगनाला भिडले असून दूध उत्पादक शेतकऱ्याला वैरणीसाठी ही पैसे मोजावे लागतात. एकूणच दूध उत्पादक शेतकरी प्रचंड प्रमाणात अडचणीत आला आहे.तो कर्जबाजारी झाला आहे.सध्या खाजगी दुध संघांची मक्तेदारीमुळे दुध ऊत्पादक शेतकर्याला किती भाव द्यायचा हेच ठरवित आहे.त्यामुळे सध्या दुध खरेदीला खुप कमी भाव मिळत आहे.दुध ऊत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.याकडे महाआघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटना रस्त्यावर ऊतरून आंदोलन करणार आहे.
महाआघाडी सरकारचा निषेध म्हणून दुध ऊत्पादक शेतकर्यांनी डेअरीला दुध घालताना काळ्या फिती लावून निर्दशने करावयाची आहेत. या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.तसेच महाआघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून खासगी दूध संघ व शासकीय दूध संघाने खरेदी केलेल्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावे.राज्यात सुमारे सव्वादोन कोटी लिटर दुधाचे संकलन केले जाते. दूध उद्योगाची उलाढाल सुमारे १०० कोटी रुपयांची आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या १ कोटी २० लाखाच्या घरात आहे.खासगी दूध संघ लाॅकडाऊनचा फायदा घेऊन दुधाचे दर पाडत आहेत. याकडे शासनाचे कसलेच लक्ष नाही. तरी दूध धंद्यातील खाजगी दूध संघांची मक्तेदारी मोडून काढावी व दूध उत्पादक शेतकऱ्याला योग्य दर वाढ द्यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्यावतीने सरकारकडे करणार असल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.सुहास पाटील यांनी दिली.
चौकट
रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातुन १० जुन रोजी संपूर्ण महाराष्ट्र भर दुध दरवाढ मागणी करत सरकारचा निषेध आंदोलन करणार आहोत.या आंदोलनात दुध ऊत्पादक शेतकर्यांनी सहभागी होऊन १० तारखेला काळ्या फिती बांधुन दुध घालावे व आंदोलनास पाठिंबा द्यावा...
आ.सदाभाऊ खोत,माजी राज्यमंत्री
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा