उस्मानाबाद शहरातील वाजिद शेख यांना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून आर्थिक मदत*
धाराशिव (उस्मानाबाद )शहरातील ईदगाह भागात राहणारे श्री. वाजीद शेख यांच्या राहत्या घरी गॅस सिलेंडर चा स्फोट होवून त्यांचा संसार अस्ताव्यस्त झाला होता,त्यांचा संसार पुन्हा जोमाने उभा राहण्यासाठी माणुसकीच्या दृष्टीने सदैव सेवा कार्य आपला माणुस म्हणुन कार्यरत असणारे जिल्ह्याचे नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी 10 हजार रुपयांची छोटीशी मदत त्यांना पोहोच करण्यात आली, यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,उपनगराध्यक्ष अभय इंगळे,नगरसेवक प्रवीण पाठक, सलमान शेख ,प्रसाद मुंडे उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा