*मराठा सेवा संघाकडून राज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन*
*करमाळा तालुका प्रतिनिधी-अतुल वारे पाटील*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानानिमित्त करमाळा तालुका मराठा सेवा संघाकडून जातेगाव येथे भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष अमोल दादा पाटील, पिंपरी चिंचवड भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब वारे पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष अमोल घुमरे उपस्थित होते.यावेळी बोलताना नानासाहेब वारे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे कार्य विश्वाला प्रेरणा देणारे आहे . जगाला छत्रपती शिवरायांच्या रूपाने एक प्रजाहितदक्ष, चारित्र्य संपन्न राजा मिळाला. त्यांच्या चरित्रातून स्वाभिमान, नवनिर्मितीची प्रेरणा मिळते. अमोल दादा पाटील यांनी शिवविचार डोक्यावर घेऊन न मिरवता डोक्यात घेऊन आचरण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.शिवाजी महाराजांनी जगात प्रथम स्वराज्याची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात साकार करून दाखवली. म्हणून जगात त्यांचा गौरव होतो.शिवविचार घराघरात पोहोचण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, सचिव सचिन शिंदे,जेष्ठ नेते शिवाजी माने, उदयनराजे पाटील, शंभूराजे पाटील उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा