डॉ.ओंकार थोरात यांची भारतीय विद्यार्थी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी नियुक्ती
माढा / प्रतिनिधी - नागपूर येथील पशुवैद्यक महाविद्यालयात स्नातकोत्तर पदवीला शिक्षण घेत असलेले व मोहोळ तालुक्यातील देवडीचे रहिवासी असलेले डॉ.ओंकार सत्यवान थोरात यांची भारतीय विद्यार्थी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याचे पत्र संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नितीन दोंदे यांनी दिले.
डॉ. थोरात यांनी यापूर्वी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी उत्कृष्ट पद्धतीने काम केले होते याची दखल घेऊन त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली.या नियुक्तीनंतर डॉ. थोरात म्हणाले की,या पदाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न व विविध शैक्षणिक सोडवण्याचा आणि त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांचे अभिनंदन सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,रामचंद्र घोंगाणे,डॉ.राजेंद्र बोराडे,चेअरमन पांडुरंग चौगुले,उपसरपंच भागवत चौगुले,मुख्याध्यापक शिवाजी तळेकर,जोतीराम थोरात, रघुवीर पासले,दत्तात्रय थोरात,अंकुश थोरात, डॉ.नागनाथ थोरात,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,विनोद खेडकर,सुधीर गुंड, रविंद्र घोंगाणे,रणजित खेडकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा