Breaking

मंगळवार, १५ जून, २०२१

क्रुझर- बसचा भीषण अपघातात बेंबळे येथील स्वाती काळे यांचा मृत्यू... तर.. आठ गंभीर जखमी**जालना येथे लग्नाला जात असताना झाला अपघात*



*क्रुझर- बसचा भीषण अपघातात बेंबळे येथील स्वाती काळे यांचा मृत्यू... तर.. आठ गंभीर जखमी*
*जालना येथे लग्नाला जात असताना झाला अपघात*

 बेंबळे। प्रतिनिधी / मुकुंद रामदासी  
         
जालना जिल्हा प्रतिनिधी/ मनीषा मगरे

   13 जून रोजी सकाळी जालना शहराच्या अंबड चौकाजवळ क्रुझर आणि खासगीबस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात क्रुझर मधील आठ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या तर बेंबळे येथील रहिवासी असणाऱ्या सौ. स्वाती अजय काळे (वय-३०) यांचा जागीच मृत्यू झाला .क्रुझर मधील सर्वजण एकमेकांचे नातेवाईक असून जालन्यातील  दुसर्‍या एका नातेवाईकाच्या लग्नाला चालले होते ,या अपघातांमध्ये स्वाती काळे यांचा जागेवरच मृत्यू झाला. गाडीत असणाऱ्या इतरा पैकी सोलंकरवाडी येथील ४, चांदज येथील २ व बेंबळे येथील २ असे एकूण आठ जण गंभीर जखमी झाले आहेत,. स्वाती काळे यांचा मुलगा सार्थक  वय..12 हा देखील गंभीर जखमी आहे, सर्व जखमीवर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.
     मयत सौ. स्वाती अजय काळे या बेंबळे- टेंभुर्णी-कोंढारभाग परिसरातील, धनगर समाजाचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य पोपट आण्णा काळे यांच्या सुनबाई आहेत .त्यांच्या पश्चात आई, वडील, सासू ,सासरे, दीर, पती व दोन मुले असा मोठा परिवार आहे .स्वाती काळे यांच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा